प्रा. भागसेन पर्वत यांना पी. एच. डी. प्रदान
येथील प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणीच्या इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल विभागात कार्यरत असलेले प्रा. भागसेन पर्वत यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्यामार्फत दिली जाणारी पी. एच. डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
प्रा. पर्वत यांनी ‘स्लायडिंग मोड कंट्रोल’ या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. प्रक्रिया नियंत्रणासाठी स्लायडिंग मोड कंट्रोल कशाप्रकारे यशस्वीरित्या वापरता येईल, यासाठी त्यांच्या या संशोधनाचा उपयोग होईल. त्यांना श्री गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था नांदेड येथील डॉ. बाळासाहेब पत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालायचे प्राचार्य. डॉ. यशवंत खर्डे यांनी त्यांचे अभिनंदन केले.