Breaking News

लोणीच्या कानिफनाथ महाराजांची यात्रा उत्साहात

प्रवरानगर प्रतिनिधी  - येथील चैतन्य कानिफनाथ महाराज तरुण मंडळाच्यावतीने लोणी परिसरातील चारी नंबर २ लगतच्या कानिफनाथ महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. दरवर्षी चैत्र मासारंभी गुढीपाडव्याच्या ही यात्रा भरते. ‘कानिफनाथ महाराज की जय' या जयघोषामुळे परिसरात भक्तिभावाचे वातावरणात पसरले. 

गेल्या ११ वर्षांपासून लोणी येथे ही यात्रा भरते. यानिमित्त दुपारी ४ वाजता येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोपट विखे यांच्या पुढाकाराने वाजत-गाजत काठीची मिरणूक काढण्यात आली. नाथमंदिराच्या मुख्य कळसाला मानाची काठी भेटविण्यात आली. त्यानंतर आश्वी येथील ह. भ. प राऊत महाराज यांचे नाथ संप्रदायावर प्रवचन झाले. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

नाथ संप्रदाय म्हटला, की प्रामुख्याने समोर येतो, तो हठयोग आणि शाबरी विद्या. नाथांनी मांडलेले तत्वज्ञान हे पिंड - ब्रम्हांड, नादबिंदू, पंचतत्वे आदींशी संबंधित होते. नाथ संप्रदाय हा अनेक उपपंथांमध्ये मांडला गेलेला आढळतो. अवघ्या जगाला मिळालेला अमौलिक असा हा ‘योग’ आहे. याचा उगम हा नाथ संप्रदायाचा हठ्योगातून झालेला आहे. नाथसंप्रदाय आणि नवनाथ यांकडे आज फक्त एक दैवी शक्ती म्हणूनच बघितले जाते. लोणी येथील चारी नंबर २ येथे कानिफनाथ महाराजांचे खूप जुने मंदिर आहे. याठिकाणी कानिफनाथांची कबर आहे. श्री चैतन्य कानिफनाथ महाराज तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी या जागृत देवस्थानचा महिमा किर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी सर्वश्री महेश विखे, आशिष विखे, प्रमोद मुसळे, ऋषिकेश विखे, सतीश विखे, अक्षय मुसळे, अतुल विखे, अभय विखे, हर्षल विखे, प्रतीक विखे, शुभम विखे, अभिषेक सोनवणे, सत्यम विखे, मंगेश विखे, अजय विखे आदी तरुण यासाठी पुढाकार घेत आहेत. 

यात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रवरा कारखान्याचे संचालक विक्रम विखे, पुणे विद्यापिठाचे सिनेट सदस्य अनिल विखे, भाऊसाहेब (गुरुजी) विखे, प्रकाश विखे, रमेश विखे, सुनील विखे, कैलास विखे, सोमनाथ विखे, विलास विखे, सुधाकर भवर, प्रमोद विखे, नंदू विखे, दत्ता विखे, अनिल म्हस्के, गणेश विखे, सागर विखे, रवी राठी, निलेश विखे, कैलास म्हस्के, शाम विखे, मयूर विखे आदींसह शेकडो महिला भगिनींनीं परिश्रम घेतले.