Breaking News

रिक्त पदांसाठी पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवणार - संजय तेली

सोलापूर  - राज्य शासनाने पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 520 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. दुसर्‍या टप्प्यातील भरती प्रक्रिया हंगामी पोलीस पाटील पदांच्या भरती प्रक्रिया कशी राबवायची? यामुळे रखडली होती. आता हंगामी पोलीस पाटील दावा करीत असलेले 171 आणि उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिलेले 178 अशा एकूण 349 पोलीस पाटील यांची भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश प्रांताधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. 

जिल्ह्यातील पोलीस पाटील पदांची 869 पदांसाठी पहिली भरती प्रक्रिया नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या दोन महिन्यात पार पडली. 869 पदांपैकी 520 पदे या भरती प्रक्रियेत राबविण्यात आली. 171 ठिकाणी हंगामी पोलीस पाटील यांनी दावा केल्याने तर 178 ठिकाणी पात्र उमेदवार न मिळाल्याने 349 पदे रिक्त राहिली. रिक्त पदांची भरती प्रक्रिया 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. मात्र हंगामी पोलीस पाटील भरती प्रक्रियेबाबत निर्णय न झाल्याने भरती प्रक्रिया रखडली होती. शासनाने हंगामी पोलीस पाटील नियुक्त असलेल्या ठिकाणी ज्यांची सेवा 24 वर्षे झाली आहे, त्यांची नियुक्ती करणार आहे. ज्यांची सेवा 24 वर्षेपेक्षा कमी झाली आहे, त्याठिकाणी भरती राबविण्यात येणार आहे. या आदेशानुसार जे पात्र ठरतील, त्यांना नियुक्ती देऊन उर्वरित ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे तेली यांनी सांगितले.