भगवान महाविरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयॊजन
श्रीरामपूर प्रतिनिधी - भगवान महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाच्या विविध मंडळांच्यावतीने उद्या {दि. २९} धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मिरवणुकीतील बांधवांसाठी थंड पाणी, शरबत, आईस्क्रीम आदींचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, भगवान महावीर जयंतीनिमित्ताने श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मंदिरात सायंकाळी भगवान महावीरांचे येथील प्रसिद्ध चित्रकार शिवा गायकवाड यांनी रांगोळी चित्र काढले. त्यांना वृषाली गाडेकर, प्रियंका गंगवाल, कोमल अभंग, वैशाली सलालकर, भारती झरेकर यांनी सहकार्य केले.
भगवान महावीर जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजता महावीरांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीस श्रीराम मंदिर चौकातून प्रारंभ होणार आहे. मिरवणुकीत प्रारंभी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, आ. भाऊसाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष करण ससाणे आदींच्या हस्ते महावीर प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.
मिरवणुकीत शिवाजीरोडवर गिरमे चौकात महावीर युवा मंचच्यावतीने थंड पिण्याचे पाणी वाटप केले जाणार आहे. जैन स्थानकासमोरील किशोर टॉकीज चौकात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तेथे भगवान महावीर जन्मोत्साचा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे. या ठिकाणी भाविकांना थंड शरबत दिले जाणार आहे. तर भगवान महावीर चौकात दिगंबर नवयुवक मंडळाच्यावतीने भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. यावेळी ड्युक्स संघटनेच्यावतीने मिरवणुकीतील भाविकांना आईस्क्रीमचे वाटप करण्यात येणार आहे. भगवंताचा पाळणा सायंकाळी दिगंबर जैन मंदिरात होणार असून याची जय्यत तयारी महिला मंडळाने केली आहे. तसेच यानिमित्ताने पाठशाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम आणि भंडारयाचा सकल जैन समाजाचे लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.