आत्मा मालिक चैत्रमहोत्सवास उत्साहात प्रारंभ
यानिमित्त सामुदायिक योगा, प्राणायाम, ध्यान, मौन या कार्यक्रमासाठी शेकडो भाविक सहभागी झाले होते. देश विदेशातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी कोपरगांवचे योग प्रशिक्षक अभिजीत शहा यांनी भक्तीमय वातावरणात संत मांदियाळीच्या उपस्थितीत योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. लहान मुलांपासून तरूणासह ज्येष्ठ नागरिकांचा यात मोठा सहभाग होता. यावेळी देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, मोहनराव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या सत्राचे कार्यक्रम संपन्न झाले.
दरम्यान, सकाळच्या प्रहरी योगामध्ये ध्यानाचे धडे विदेशी पाहुण्यांनी गिरवले. आपल्या देशाची संस्कृती बाजूला ठेवून आत्मा मालिक माउलींची शिकवण अंगिकारताना विदेशी पाहुणे दिसून आले. आत्मा हाच परमेश्वर आहे. परमेश्वराला इतर ठिकाणी शोधण्याची गरज नाही. तो आपल्या हृदयात आहे. म्हणून आत्म्याचे आपणच चिंतन करण्याची गरज आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव परदेशातील भाविकांनी घेतला. यावेळी देशभरातील शेकडो भाविकांसमवेत प. पू. आत्मा मालिक माउली, संत देवानंद महाराज, संत परमानंद महाराज, सर्व संतमांदियाळी, आश्रमाचे पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते.