Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष : विठ्ठलराव लंघे


भेंडा/ प्रतिनिधी /- शरद पवार हे देशातील शेतकरी-कष्टकऱ्यांचे नेते आहेत. त्यांचे मंत्री पदाचे कालावधीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. असे वक्तव्य जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी केले.

भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखाना सभागृहात नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षांतर्गत निवडीसाठी आयोजित कार्यकर्त्यांचे बैठकीत लंघे बोलत होते.

जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी आमदार पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.