Breaking News

ज्ञानाने होते मनाची स्वच्छता : वर्षा बहेनजी


भेंडा/ प्रतिनिधी /- ज्ञानात वृद्धी व्हावी आणि ते सर्वांपर्यंत पोहचावे ही परमात्म्याची इच्छा आहे.बाह्य स्वच्छतेबरोबरच मनाची स्वच्छता ही महत्त्वाची आहे.मनाची स्वच्छता केवळ ज्ञानामुळेच होते असे वक्तव्य राहाता येथील ब्रम्हाकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या प्रमुख ब्रम्हाकुमारी वर्षा बहेनजी यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गीता पाठशाळेच्या २१ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना वर्षा बहेनजी बोलत होत्या. नेवासा केंद्राच्या प्रमुख ब्रम्हाकुमारी सरला बहेनजी, ब्रम्हाकुमारी वंदना बहेनजी, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक काशिनाथ नवले, कामगार संचालक सुखदेव फुलारी, रत्नमाला नवले, सरपंच सुनील खरात, बाळासाहेब नवले, बद्रीशेठ, हरिभाऊ नवले व्यासपीठावर उपस्थित होते.

भेंडा गीता पाठशाळेला माउंटआबु मुख्य केंद्राकडून उपकेंद्राचा दर्जा मिळाला आहे. त्याचे प्रमाणपत्र सरला बहेनजी यांचे हस्ते पाठशाळा चालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी सोपानराव महापूर, सुभाष चौधरी, किशोर नवले, कैलास मोटे, अशोक लोहकरे, मुंगसे गुरुजी, मिराताई नवले, कांचन नवले, रेखा,वाघ आदी उपस्थित होते. वंदना बहेनजी यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले.