Breaking News

जागल्या...!

दै. लोकमंथन दि.18 मार्च 2018 रोजी दहा वर्षाचा प्रवास पुर्ण करून अकराव्या वर्षात प्रवेश करीत आहे. वृत्तपत्र सुरू करणे, ते चालविणे, सलग दहा वर्ष अखंडपणे पत्रकारितेचे व्रत सांभाळून अहमदनगर सारख्या ग्रामीण वातावरणात टिकवून, राज्यातील चौदा जिल्ह्यांत आवृत्तीचे प्रकाशन करणे हा लेख लिहिण्या इतकी सोपी बाब नाही. अब्जा धिश संपत्तींचा वारसा लाभूनही भल्या भल्यांची थरथर व्हावी अशा या पांढरा हत्ती पोसण्याच्या व्यवसायात सामान्य माणसाला पाय ठेवायलाही वाव मिळण्याची शक्यता दु र्मिळातील दुर्मिळ. तथापी दृष्टीकोन शुध्द आणि स्पष्ट असेल, नैतिक मूल्य शाबूत असतील, स्वार्थ आणि परमार्थ या दोहोंतील सीमा सांभाळून स्वार्थाच्या भाव पाशांचा त्याग क रण्याचे कसब साधता आले तर समाजाचा घटक म्हणून सामाजिक बांधिलकीच्या तळमळीला चळवळीचे व्यासपीठ निर्माण करून देणारा सामान्यातील सामान्य माणूसही ध्येय गाठून वृत्तपत्र व्यवसायाचा पांढरा हत्तीही उत्तमपणे पोसू शकतो, याचे उदाहरण म्हणजे अशोकराव विठ्ठलराव सोनवणे, मुख्य संपादक दै. लोकमंथन. 


प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर बसून सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणून आज या क्षणापर्यंत चौदा जिल्ह्यांत आपले स्वतःचे स्थान निर्माण केलेल्या दै. लोक मंथनच्या एकेकाळी मालक, संपादक, प्रकाशक, मुद्रक इतकेच नाही तर वितरण व्यवस्था प्रमुख, जाहिरात व्यवस्थापक म्हणून एकाच वेळी वेगवेगळ्या भुमिकेत जगणार्‍या अशोक सोनवणे या जागल्याचा इथपर्यंतचा प्रवास जितका रंजक तितकाच चित्तथरारक. या चित्तथराराने लोकमंथनने आजच्या कार्पोरेट जगताचा चेहरा स्वीकारण्यापर्यंत मजल मारली आहे. अर्थात पत्रकारितेचा मुळ आत्म्याला डंख नकरता. दै. लोकमंथन उत्तर महाराष्ट्राच्या अहमदनगर सारख्या ग्रामिण भागातून प्रकाशित होऊन राज्यपातळीवर दबदबा निर्माण करणारे एक आणि एकमेव दैनिक बातमी पत्र. कुठल्याही बातमी पत्राचे यश त्याचे वितरण आणि पानापानावर भरलेल्या जाहिरातीच्या गर्दीवरून मोजले जाते. अर्थात आजच्या व्यवसायिक पत्रकारितेच्या जगाची ती अपरिहार्यता आहे. हे अमान्य करता येणार नाही. यशाचे पितृत्व या भौतिक परिमाणाला दिला जाण्याची मानसिकता समाजात बळावत गेल्याने पत्रक ारीतेचा मुळ गाभा मात्र हरवल्याचे शल्य तीव्र होत आहे. हेही नाकारता येणार नाही.
पत्रकारिता पुर्वजांनी ज्या हेतूने जन्माला घातली, तो हेतू जपणे आजच्या व्यवसायिक पत्रकारितेच्या जीवावर येणे स्वाभाविक आहे. तरी देखील हा हेतू जगणारा एक वर्ग या भाऊ गर्दीत वाट काढून पत्रकारितेचा आत्मा पुनरूज्जीवित करण्यासाठी धडपडतांना दिसतो आहे. विद्यमान पत्रकारितेच्या यशाच्या परिमाणात त्याची खीजगणती होत नसेलही क दाचीत, पण त्या परिमाणाच्या नजरेतील अपयशाचे विष पचवून समाज प्रबोधनाचे अमृत शोधण्याची धडपड पत्रकारितेच्या मुळ हेतूला जिवंत ठेवण्यास कारणीभूत ठरते आहे. समाजकारंणाशी जवळचा संबंध जपत दीन दलित उपेक्षितांच्या जीवन मरण ज्यांच्या पत्रकारितेची दैनंदिनी आहे, तो सामान्यातला सामान्य माणूसही आपल्या ध्येय प्रेरित पत्रक ारीतेला व्यवसायिक गर्दीतही स्वतःची जागा मिळवून देऊ शकतो. संपादक अशोक सोनवणे आणि दै.लोकमंथन हे त्याच वाटेवरचे प्रवासी.
दै. लोकमंथनच्या या दहा वर्षातील प्रवासाला अशोक सोनवणे नावाच्या पत्रकाराची तीस वर्षाची पत्रकारीता प्रेरक आहे. तीस वर्षापुर्वी म्हणजे वयाच्या चोवीसाव्या वर्षापासून अशोक सोनवणे नावाचा हा तरूण पत्रकार ध्येय वेडाने पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर भटकत होता. तारूण्याला चिकटलेले सारे गुण तेव्हा सोबत करीत असल्याने तरू ण पत्रकाराचा बिनधास्त वावर पत्रकारितेला न्याय देण्यास पुरक ठरला तितकाच अडचणीचाही. या तरूणाची धडपड खरी पत्रकारिता जगत असतांना तत्कालीन समाज व्यवस्थेच्या काही जुनाट काही नव्या रूढी परंपरा, विचार, तत्वे, धोरणे यांचा जाणीवपूर्वक अभ्यासही सुरू होता. त्या काळात महाराष्ट्राच्या तरूणाईला साद घालून अवघा महाराष्ट्रात मराठीपणाची डरकाळी फोडणार्‍या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आकर्षण अशोक सोनवणे या तरूण रक्ताच्या पत्रकारालाही भुरळ पाडणार नाही, हे अशक्य होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने खांद्यावर डौलू लागला. मात्र भगव्याची साथ फार काळ लाभली नाही. भगव्याच्या आडून सामाजिक विषमता अधिक बळकट करण्याचा शिवसेनेचा छुपा अजेंडा मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने चव्हाट्यावार आला. विश्‍वनाथ प्रतापसिंग यांनी लागू केलेल्या मंडल आयोगाच्या शिफारसींना तत्कालीन शिवसेनेने केलेला विरोध, अशोक सोनवणे यांच्या सारख्या बहुजनांचे रक्त सळसळणार्‍या तरूणाला पचवणे शक्य झाले नाही. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून ओबीसी बहुजनांचे हक्क त्यांच्या पदरात टाकण्यासाठी नवी वाट चोखाळलेली. शिवसेनेचे तत्कालीन मुखपत्र असलेल्या मार्मिक या व्यंग साप्ताहिक ाच्या बहुजनद्रोही राजकीय प्रचारावर मात करण्यासाठी 1987 मध्ये नवा मार्मिक नावाचे साप्ताहिक सुरू केले. नवा मार्मिक सोबत सुरू केलेल्या या पत्रकारितेने वेगळी दिशा घेत बहुजन पत्रकारितेचा नवा अजेंडा स्वातंत्र्योत्तर पत्रकारितेत रूजविला. तेव्हापासून लोकमंथनच्या दशकपुर्तीचा सोहळा संपन्न होईपर्यंत प्रत्येक टप्यावर अशोक सोनवणे यांची बहुजन पत्रकारिता बहरत गेली. समाजाकडूनही या अजेंड्याचे यथाशक्ती स्वागत होत गेले.
एका बाजूला पत्रकारिता आणि दुसर्‍या बाजूला समाजकारण या दोन चाकांवर समाजसेवेचा रथ धावत असतांना मार्गावर अनेक खाच खळगे आले. उंचवटे निर्माण केले गेले. मात्र ध्येय स्पष्ट होते. खाच खळगे, उंचवटे पार करीत 2007 मध्ये अहमदनगर शहरातून लोकमंथन नावाचे सायं दैनिक सुरू केले. मात्र सायंदैनिकाला असलेल्या मर्यादा पत्रका रितेच्या हेतूला न्याय देऊ शकत नाहीत हे वास्तव लक्षात आल्यानंतर वर्षभरातच सकाळचे बातमीपत्र सुरू करून ते समाजाला अर्पण करण्याचा मानस दि.19 मार्च 2008 रोजी प्रत्यक्षात आणला. आणि तेव्हा पासून दै. लोकमंथन आज दहा वर्षाचा प्रवास पुर्ण करेपर्यंत अशोक सोनवणे यांची बहुजन पत्रकारिता प्रत्येक अंगाने विकसित होत गेली. या दहा वर्षात अहमदनगरचे हे दै. लोकमंथन मुंबई, पुणे नाशिक हा विकासाचा त्रिकोण छेदून सांगली, सातारा या पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या मार्गावरून बीड उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, बुलढाणा, जळगाव, नांदेड, लातूर, या मराठवाडा विदर्भ आणि काही अंशी (नाशिक, अहमदनगर, जळगाव) उत्तर महाराष्ट्र अशा चौदा जिल्ह्यात प्रकाशित होऊ लागले. अहमदनगरच्या मातीत इतिहास पिकविण्याची, जतन करण्याची आणि संवर्धन करण्याची उपजत क्षमता आहे. तीच क्षमता दै. लोकमंथननेही पुर्णपणे उपयोजित करून महाराष्ट्रात सकारात्मक पण प्रसंगी आक्रमक पत्रकारिता जाणीवपुर्वक रूजविली. मुळात सामाजिक बांधिलकीतून विकसित झालेला अशोक सोनवणे यांचा पिंड लोकमंथनच्या प्रकृ तीतही जशाचा तसा उतरला. नव्हे लोकमंथनचा तो स्वभाव बनला. पत्रकारिता हा व्यवसाय नाही तर समाज विकासाचे साधन आहे हे धोरण स्वीकारून पत्रकारितेचे व्रत जगणारे अशोक सोनवणे लोकमंथनच्या व्यासपीठावरून ‘लोकजागर’ अव्याहतपणे करीत आहेत. अशोक सोनवणे नावाच्या या जागल्याकडून आमच्यासारख्या शेकडो पत्रकारांनी हा जागर कायम चेतविण्याचा संकल्प तडीस नेण्याचा निर्धार केला आहे. सकारात्मक पत्रकारितेचा वसा जपत असताना प्रसंगी आक्रमक होतानाही कुठेही शिवराळ व्हायचे नाही हे त्यांनी  जाणीवपुर्वक घातलेले बंधन पाळत लोकमंथनची पत्रकारीता महाराष्ट्र दौर्‍यावर निघाली आहे. ध्येयपुर्ती शिवाय आता थांबणे नाही ही संपादक अशोक सोनवणे यांची प्रेरणा लोक मंथनच्या चमुला स्वस्थ बसू देणार नाही, ही खात्री आहे.
कुमार कडलग,
नाशिक