श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील बंदिपोरा येथे हाजीन परिसरात गुरूवारी सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शकरूद्दीन गावात सकाळपासुनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. जवानांना काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूवातीला हे फक्त सर्च ऑपरेशन होते,पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि याचे चकमकीत रूपांतर झाले.
चकमकीत एक दहशतवादी ठार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:02
Rating: 5