Breaking News

महिलांच्या वाढत्या अत्याचाराविरोधात ‘मौन आंदोलन’


पुणे : महिलांची सुरक्षितता व वाढते अत्याचार हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांवरील अत्याचाराविरोधात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज पिंपरीत मौन आंदोलन केले. ’बढने जाते महिलाओंपे अत्याचार, कहाँ है फडणवीस सरकार?’, ‘हमे चाहिए सुरक्षा’, ‘हम शर्मिंदा कब नहीं होगें’,‘हिंसा नहीं सम्मान चाहिए, जीवन का आधार चाहिए’, ‘हमे सुरक्षा चाहिए’, ‘लगातार बलात्कार, फडणवीस सरकार गुन्हेगार’ असे फलक राष्ट्रवादीच्या आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले होते. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.