Breaking News

राज बब्बर यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

लखनऊ : उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर बब्बर यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणात दोन जागांना महत्त्वाचे स्थान आहे. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदी निवडून आल्यानंतर गोरखपूर मतदारसंघाचा खासदारकीचा राजीनामा दिला. तर केशव प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशचेउपमुख्यमंत्री झाल्यानंतर फुलपूर जागेचा राजीनामा दिला होता.
गोव्यातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनीही सोमवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.