Breaking News

39 भारतीयांच्या हत्येप्रकरणी संसदेत गदारोळ राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब


नवी दिल्ली : पीएनबी घोटाळा प्रकरणावरून सरकार आणि विरोधी पक्षात वाद सुरू असतानाच काँग्रेसने 39 भारतीयांच्या इराकमधील हत्येवर शोक व्यक्त करत राज्यसभेत चर्चेची मागणी केली. यावर उत्तर देताना आपण चर्चेस तयार आहोत, परंतु विरोधी पक्ष मुद्दाम गोंधळ निर्माण करून चर्चेपासून दूर पळत असल्याचा आरोप सरकारने केला. गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. आज सलग तेराव्या दिवशी संसदेतील कामकाज बाधित झाले आहे. दुसरीकडे सरकारच चर्चेपासून दूर पळत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. टीडीपी व वायएसआरसीपी या दोन्ही पक्षांनी सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्तावाचा अर्ज दाखल केला आहे. रालोआमधून बाहेर निघाल्यानंतर टीडीपीतर्फे टीआरएस व टीएमसी यांच्यासोबत मिळून तिसर्‍या आघाडीच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आपले म्हणणे ऐकले जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षांतर्फे केला जात आहे.