Breaking News

वाळू उत्खनन तपासणी अहवाल सादर करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सिंधुदुर्ग - जिल्ह्यातील वालावल, मोचेमाड, कर्ली आदी खाड्यातील आतापर्यंतच्या वाळू उत्खननानुसार या खाड्यांचे चॅनेल क्लिअर होणे आवश्यक होते. याबाबत महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड, उपविभागीय अधिकारी, संबंधीत तहसिलदार तसेच पोलीस अधिकारी यांनी संयुक्त तपासणी करुन सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत दिले.


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वाळू उत्खनन संदर्भात आज पालकमंत्री केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी वाळू उत्खननाबाबत सविस्तर आढावा त्यांनी घेतला. मेरी टाईम बोर्डाने रेखांकन करुन दिल्यानुसार खाडीत झेंडे लावले आहेत का ? किती होड्या वाळू उत्खनन करतात ? किती ब्रास वाळू काढली जाते? पासेस याबाबत या पथकाने संयुक्तरित्या तपासणी वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करावा अशी सूचना करुन केसरकर यांनी या संदर्भात सविस्तर आढावा या बैठकीत घेतला.