Breaking News

थकबाकी असलेल्या 77 मिळकतींना पालिकेने ठोकले टाळे

पुणे : मिळकतकराची थकबाकी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असणा-या मिळकतधारकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. सव्वा लाखाच्या आसपास मिळकतधारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. तर, थकबाकी असलेल्या 77 मिळकतींना पालिकेने टाळे ठोकले आहे. दरम्यान, आजअखेरपर्यंत 47 कोटी 10 लाख रुपये थकबाकी वसूल झाली असून 11 कोटी थकबाकी आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सव्वा चार लाखांच्या आसपास मिळकती आहेत. या मिळकतींना महापा लिकेतर्फे कर आकारणी केली जाते. मिळकत भरण्यासाठी पालिकेने 16 ठिकाणी सोय उपलब्ध करुन दिली आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, पालिका भवन, फुगेवाडी, भोसरी, च-होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे आणि दिघी बोपखेल या ठिकाणी मिळकत कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड कर संकलन विभागामार्फत 3 जानेवारी 2018 अखेर ज्या मिळकतधारकांकडे रक्कम रुपये पाच हजार पेक्षा जास्त थकबाकी आहे, अशा सव्वा लाखाच्या आसपास मिळकतधारकांना मिळकत कर भरण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. जे मिळकतधारक नोटीस बजावूनही थकबाकी भरणार नाहीत, अशा मोठ्या थकबाकीदार मिळकतधारक ांच्या मिळकतींवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतूदीनुसार जप्ती किंवा अटकावून ठेवण्याची कारवाई करण्यात येत आहे.
महापालिकेकडे आजअखेरपर्यंत 47 कोटी 10 लाख रुपये थकबाकी वसूल झाली असून 11 कोटी थकबाकी आहे. पालिकेने थकबाकी असलेल्या 77 मिळकतींना टाळे ठोकले आहे. थेरगावातील सर्वांत जास्त थकबाकीदार मिळकती असून तेथिल 24 मिळकतींना टाळे ठोकले आहे. त्याखालोखाल आकुर्डी परिसरातील 14, चिंचवड 12, तळवडे 9, सांगवी 9, मोशी 5, पिंपरीनगर 3, निगडी, प्राधिकरण 1 अशा 77 थकबाकीदार असलेल्या मिळकतींना टाळे ठोकले आहे. नागरिकांच्या सोईचे दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरु ठेवण्यात आली आहेत. मिळकतधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. तसेच मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणार्‍या मिळकतधारकांना सामान्य करात 2 टक्के सवलत आहे. त्यासाठी महापालिकेच्या ुुु.लिालळपवळर.लेा या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.