राज्यातील 6 रेल्वे स्थानके होणार जागतिक दर्जाची
पुणे : केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील पुणे, लोणावळा, इगतपुरी, सोलापूर आणि वर्धा रेल्वे स्थानक ांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या अधिकृत शासकीय ट्विटर अकांऊटवर ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
वर्धा रेल्वेस्थानकाची पुनर्विकास प्रकल्पासाठी निवड झाल्याची बातमी कळल्यानंतर खासदार तडस यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेलभवन, दिल्ली येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले. वर्धा रेल्वे स्थानकाचा विकास म्हणजे अनेक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्याने भविष्यात अनेक लांब पल्ल्यांच्या प्रवासी रेल्वे गाड्या येथे थांबू शकतात. तसेच वर्धा रेल्वे स्थानकावरुन अनेक प्रवासी रेल्वे गाड्या प्रारंभ होण्याकरिता निश्चितच मदत होईल. वर्धा रेल्वेस्थानकाचा पुर्नविकास तसेच जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र निर्माण करताना तंत्रज्ञान, स्थानिक संस्कृती व ऐतिहासिक महत्त्व या प्रमुख तत्वांवर वर्धा रेल्वेस्थानकाची निर्मिती प्रस्तावित आहे.