Breaking News

एटीएसकडून 6 बांगलादेशी नागरिकांना अटक

मुंबई : ठाणे एटीएसने केलेल्या कारवाईत बांगलादेशच्या 6 नागरिकांना भिवंडी परिसरातून अटक केली. गेल्या काही दिवसांपासून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, रायगड परिसरात सुरू क रण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान एटीएस पोलिसांकडून ही धडक कारवाई केली जात आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींकडे कुठल्याही प्रकारचा अधिकृत प्रवास परवाना नाही. एटीएस पोलिसांच्या चौकशीत या आरोपींना ते बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले आहे. भारताला आणि खास करून मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यासारख्या शहराला असणारा दहशतवादी धोका लक्षात घेता महाराष्ट्र एटीएस पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. अटक करण्यात आलेले हे 6 बांगलादेशी नागरिक 19 ते 26 वयोगटातील आहेत. एटीएस पोलिसांच्या तपासानुसार बांगलादेशमधील बंदी घालण्यात आलेल्या अन्सारूला बांगला टीम या जहाल संघटनेचे नेटवर्क भारतात आणि खास क रून महाराष्ट्रात पसरवायचे असल्याने भारताला धोका वाढला आहे. अटक करण्यात आलेले हे 6 बांगलादेशी आरोपी भिवंडी परिसरात प्लंबर आणि नाका मजूर म्हणून काम करीत होते. ठाणे एटीएस पोलिसांच्या माहितीनुसार हे नागरिक बांगलादेशमधील छताग्राम, फरीदपूर आणि नवखाली या जिल्ह्यातील राहणारे आहेत. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.