Breaking News

श्री सिद्धेश्‍वर देवस्थान मंदिर पंच कमिटीला 25 लाखांचा दंड


श्री सिद्धेश्‍वर मंदिरात विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेने श्री सिद्धेश्‍वर देवस्थान मंदिर पंच कमिटीला 25 लाख 39 हजार रुपयांचा दंड केला आहे. श्री सिद्धेश्‍वर मंदिरात सभामंडपाचे काम करताना मंदिर समितीने 20 जून 2017 रोजी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार महापालिकेने पाहणी करून 18 जुलै 2017 रोजी नगररचना विभागाकडून अभिप्राय मागवला होता.

बांधकाम परवान्यासाठी केलेला अर्ज आणि चुकीच्या पद्धतीने तलावात खोदकाम करून केलेले बांधकाम यात तफावत आढळल्याने महापालिकेने हा दंड केला आहे.परवानगी न घेता बांधकाम करणे व ते ही परवानगीत नमूद जागेपेक्षा जास्त जागेवर करणे त्यामुळे मंदिर समितीला 20 लाख 36 हजार 600 इतकी दंडाची रक्कम व बांधकाम शुल्क असे मिळून 25 लाख 39 हजार रुपये भरायचे आहेत. यासंदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.शहरात चुकीच्या पद्धतीने असे बांधकाम होत असेल तर त्याची पाहणी व मोजणी करून दंड आकारला जातो. सिटी सर्व्हे क्रमांक 6065 या जागेत हे बांधकाम होत असल्याचे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.