Breaking News

खडकीत शुक्रवारी शस्त्रास्त्र प्रदर्शन


आयुध निर्माणी दिनानिमित्त खडकीत शस्त्रास्त्र साहित्य प्रदर्शनाचे येत्या शुक्रवार व शनिवारी आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना शस्त्रास्त्र साहित्याची माहिती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. खडकीतील रेंजहिल्स इस्टेट, आनंद भवन येथे आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन खडकी दारूगोळा कारखान्याचे वरिष्ठ महाप्रबंधक मनोजकु मार महापात्र यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. 

शनिवारी सकाळी दहा ते रात्री 8 पर्यंत खुले असणार आहे. तसेच शनिवारी ऍम्युनिशन फॅक्टरी हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतीय आयुध निर्माणीचा पहिला कारखाना ’गन ऍण्ड शेल फॅक्टरी’ या नावाने काशीपूर (कोलकत्ता) येथे 18 मार्च 1802 रोजी स्थापना करण्यात आला होता. म्हणून हा दिवस ’आयुध निर्माणी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो.