Breaking News

अयोध्या प्रकरणावर 14 मार्चला सुनावणी. याचिकाकर्त्यांना दिला 2 आठवड्यांचा वेळ

नवी दिल्ली : अयोध्या वादावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, या प्रकरणात आधी मुख्य याचिकाकर्त्यांच्या याचिकेवर सुनावणी होईल. त्यानंतर इतर संबंधित याचिकांवर सुनावणी होईल. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने ही सुनावणी सुरु केली. सुनवाई दरम्यान सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटले की, त्यांना कागदपत्रांच्या अनुवादासाठी थोडा वेळ पाहिजे आहे. त्यानंतर कोर्टाने सगळ्या पक्षाच्या लोकांना त्यांचे कागदपत्र आणि पुरावे पूर्ण करण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. 14 मार्चला आता या प्रकरणाची सुनावणी होईल.


या प्रकरणाशी संबंधित व्ह़िडिओ 2 आठवड्यांत कोर्टासमोर ठेवावे. या प्रकरणावर मुख्य याचिकाकर्ते रामलला, सुन्नी वक्फ बोर्ड आणि निर्मोही अखाडा यांनी याचिका केली आहे. सुन्नी वक्फ बोर्डकडून एजाज मकबूल यांनी कोर्टाल सांगितले की, आता पुराव्यांना अनुवाद पूर्ण नाही झाला आहे. जे सुनावणी दरम्यान कोर्टासमोप ठेवायचे आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने म्हटलं की, आता अजून 10 पुस्तकं आणि 2 व्हिडिओ कोर्टासमोर ठेवायचे आहेत. 42 भागांमध्ये अनुवादित पुरावे कोर्टात जमा केले आहेत.