स्थलांतरीत पक्ष्यांची पंढरी म्हणून प्रसिध्द असणारे उजनी धरणातील विस्तृत पाणफुगवठयावर मासेमारी करणारे समुद्र पक्षी लक्षणीय संख्येने येऊन दाखल झाले आहेत. नेहमी समुद्रावर वावर असलेले हे मत्स्यहारी पक्षी उजनी जलाशयाच्या सर्व भागात अढळून येत आहेत. समुद्रातील खार्या पाण्यातील माशांची चव चाखणारे हे समुद्रपक्षी आता उजनी धरणातील गोडया पाण्यातील माशांच्या चवीचा आस्वाद घ्यायला सरसावले आहेत. हिमालयातील मानससरोवर तसेच लडाख भागातील जलस्थानावर वीण घालून व भारतीय उपखंडाच्या पुर्व - पश्चिम सागरी किनारपट्टीवर मत्स्याहार करत उदरनिर्वाह करणारे अनेक प्रकारचे सिंगल अर्थात समुद्र पक्षी उजनीच्या जलाशयावर हिवाळ्यात दरवर्षी येतात. त्यापैकी ब्लॅक हेडेड गल्स आजमितीस कर्जत आणि करमाळा तालुक्यातील उजनी धरणाच्या बॅक वॉटर जलाशयाच्या पसरलेल्या पाणफुगवठ्यावर अधिक प्रमाणात वावरताना दिसत आहेत. स्थालंतर करून आलेले हे मत्स्यप्रिय विहंग पुढील चार महिन्याच्या येथील वास्तव्यांनतंर मान्सूनप्रारंभी आपल्या वंशाभिवृध्दीसाठी मुळस्थानी परतात. आकाराने ब्राहाणी घाराएवढे असलेल्या ब्लॅक हेडेड गल्स सध्या पांढरीशुभ्र वाटतात. परंतू काही दिवसात त्याच्या डोक्यावर काळा डाग तयार होतो. नंतर उन्हाळ्यात डोक्याचा रंग काळसर तपकिरी होतो. या पक्ष्यांमध्ये पंखातील अप्रभाग पांढरा असतो. त्याची किनार काळसर असते. चोच पिवळया रंगाची असते. चोचीचे अग्रटोक काळसर असते.
स्थलांतरीत बदकेही मासेमारी करतात : उजनी जलाशायावर विविध स्थलांतरीत बदकेही मासेमारी करण्यासाठी येत असतात. यंदाही येतील असे मत पक्षी अभ्यासक अरविंद कुभार यांनी व्यक्त केले.
उजनी जलाशयावर गोडा व चविष्ट मासा यावर्षी उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे पाण्याचा दर्जा उत्तम झाला आहे. त्यामुळे माशांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे. उत्तम प्रतीचे मासे उपल्बध होत असल्यामुळे या वर्षी गळपक्षी विपुल प्रमाणात आले आहेत. उजनी जलाशयातील मासे गोड व चवीष्ट असल्याने महाराष्टात या माशांना मोठया प्रमाणात मागणी असते. अमीत मोरे पा. मा. उपसरपंच खेड
उजनी धरण क्षेत्रामध्ये पक्ष्यांचे आगमन...
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:15
Rating: 5