Breaking News

मिरजगावात रास्तारोको; गावबंद ठेवून पुतळ्याचे दहन


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने, याचा निषेधार्थ मिरजगाव येथील क्रांती चौकामध्ये रस्तारोको, करण्योत आला. त्याचबरोबर गावबंद ठेवून छिंदमचे प्रतिकात्मक दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव येथील क्रांति चौकामध्ये एकतास रस्तारोको आंदोलन सर्व पक्षांच्या वतीने करण्यात आले, यावेळी जि. प. सदस्य गुलाब तनपुरे, सरपंच नितीन खेतमाळस, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती प्रशांत बुध्दिंवत, शिवसेनेचे अमृत लिंगडे, संजय पवार, भाजपाचे हरीदास केदारी, डॉ. चंद्रकांत कोरडे, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, राजेंद्र गोरे, भाजपा शहराध्यक्ष कैलास बोराडे, शिवसेना शहराध्यक्ष संजय शेलार, ग्रा. पं. सदस्य लहु वतारे, संजय बावडकर, लहु कोरडे, सचिन म्हस्के, सादिक शेख, सलिम आतार, सागर वतारे, राम रंधवे, शहाजी करपे, आदिंची यावेळी भाषणे झाली. यावेळी गुलाब तनपुरे म्हणाले की, भाजपाच्या सरकारला सत्तेवर येऊन अजून चारवर्ष देखील पुर्ण झाली नाही, एवढ्यातच सत्ताभोगणार्‍या पदाधिकारी व नेते मंडळींचा जिभेवरचा ताबा सुटत चालला आहे. हे भाजपा सरकार गेली पन्नास वर्षांपासुन सत्तेपासून जनतेने लांब ठेवले होते. परंतु दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या दुःखद निधनामूळे. जनतेने एक सहाणूभुती दाखवून सत्ता दिली, त्याचा गौरफायदा आज भाजपाचे पदाधिकारी व नेते मंडळी घेत असल्याने एका उपमहापौराची सत्तेच्या नशेमध्ये जीभ घसरली हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. या आंदालनावेळी नगर सोलापूर महामार्गावरील तब्बल एक तास वाहतूक खोळबंली यामध्ये अनेक प्रवाशांची कुचबंना झाली. एक तास चाललेल्या रस्तारोको आंदोलनाबरोबर गाव बंद करून छिंदमच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या प्रसंगी मिरजगाव दुरक्षेत्राचे पोलीस हे. कॉ. दत्तात्रय कासार, बबन दहिफळे यांनी चोख बंदोबस्त बजावला.