Breaking News

किसान आर्मी तर्फे संघर्षशील शेतकर्‍यांसाठी हेल्पलाईन


शेवगाव / प्रतिनिधी । धर्मा पाटील या शेतकर्‍याच्या आत्महत्या प्रकरणापासून प्रेरणा घेत शेतकर्‍यांची सद्यस्थिती बदलावी म्हणून, आम्ही काही तरुण शेतकर्‍यांनी एकञित येऊन भारतीय किसान आर्मीची स्थापना केली, शेतकरी आत्महत्या मुक्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असुन, त्याचाच एक भाग म्हणून व्यवस्थेसोबत लढत असलेल्या शेतकर्‍यांना आमची मदत व्हावी, म्हणून शिवजंयती पासून हेल्पलाईन सुरु करत आहोत. अशा शेतकर्‍यांनी 7038574440 या नंबरवर प्रत्येक रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन असे किसानचे संस्थापक अध्यक्ष नितीन ढाकणे यांनी म्हटले आहे. किसान आर्मीतर्फे आपल्या लढ्यास शक्य तेवढे सहकार्यासह बळ देण्याचा प्रयत्न केला जाईल. हताश होऊन टोकाचा निर्णय न घेता, प्रतिकूल परिस्थितीमध्येही मार्ग नक्कीच काढता येतो. आम्ही आपल्या सोबत आहोत. मिळून लढू आणि परिस्थिती अनुकूल करू असे किसान आर्मी तर्फे सांगण्यात येत आहे. यावेळी किसान आर्मीचे कायदेशीर सल्लागार म्हणून अ‍ॅड. गोंविद निकाळजे यांनी तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून रवि ऊगलमुगले यांनी जबाबदारी घेतल्याचे निलेश ढाकणे यांनी सांगितले.