Breaking News

श्रीगोंदा नगर पालिकेच्या विषय समित्यांची निवड


श्रीगोंदा /प्रतिनिधी/- श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समिती सभापतीच्या निवडी गुरुवारी ८फेब्रुवारी २०१८रोजी प्रांत अधिकारी गोविंद दाणेज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. यावेळी बांधकाम सभापती म्हणून दादा औटी तर तर नियोजन सभापती म्हणून भागचंद घोडके याची निवड करण्यात आली. 
श्रीगोंदा नगरपालिकेच्या विषय समितीच्या सभापती निवडीसाठी पालिका सभागृहात प्रांत अधिकारी गोविंद दाणेज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बांधकाम सभापती म्हणून नगरसेवक दादा औटी , तर नियोजन सभापती म्हणून भागचंद घोडके, आरोग्य व स्वच्छता अर्चना गोरे, पाणी पुरवठा सुनील वाळके, महिला व बालकल्याण सभापती म्हणून संगीता खेतमाळीस यांची निवड करण्यात आली आहे. 

या निवडी बद्दल आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे आदींनी अभिनंदन केले.