Breaking News

प्रबोधनकार नागेश्वरी झाडे महाराज यांचा सन्मान


नेवासा /तालुका प्रतिनिधी/- राष्ट्रीय समाज प्रबोधनकार नागेश्वरी महाराज झाडे यांनी तरवडी येथे नुकतीच भेट दिली. यावेळी तरवडी ग्रामस्थ व युवा नेते शंकरराव कन्हेरकर यांच्या वतीने स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच सुभाष महाराज झाडे यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते शंकरराव कन्हेरकर सरपंच भाऊसाहेब दरवडे, रामभाऊ कन्हेरकर, अशोक क्षीरसागर, सुनिता कन्हेरकर, माधुरी दरवडे, मंगल कन्हेरकर, सुजाता कन्हेरकर, विजया कन्हेरकर, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.