Breaking News

नागपुरात पत्रकारांच्या आई व मुलीची हत्या

नागपूर : नागपुरात 17 फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता असलेली महिला आणि तिच्या नातीचा मृतदेह आज, रविवारी सकाळी आढळून आला. उषा सेवकदास कांबळे (54) आणि राशी रविकांत कांबळे असे मृत महिला आणि चिमुकलीचे नाव आहे. 


नागपुरातील पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहणारे पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा कांबळे आणि मुलगी राशी यांचे शनिवारी सायंकाळी अपहरण क रण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले. रविवारी सकाळी 10.30 वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्याने लगेच पोलिसांचा सूचना दिली. दरम्यान शनिवारी सायंकाळीच रविकांत यांनी आई व मुलगी बेपत्ता असल्याची पोलीसात तक्रार दिली होती. त्यनुसार पोलिसांनी रविकांत यांना सूचित केले. ते घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली. एखाद्या पत्रकाराच्या आई व मुलीचा खून करण्याची ही नागपूरच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.