Breaking News

बेसबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी प्रा. कुठे


कोपरगाव :- राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र बेसबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी के. जे. सोमैया महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनील कुठे यांची मार्गदर्शक (कोच) म्हणून महाराष्ट्र बेसबॉल संघटनेने निवड केली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली. या स्पर्धा दि. ८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत दुर्ग (छत्तीसगढ) येथे होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुले व मुली असे दोन संघ सहभागी होणार आहेत. या निवडीबद्दल अशोकराव रोहमारे, सचिव विधीज्ञ संजीव कुलकर्णी, सुनील बोरा, संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव अहमदनगर बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, मकरंद कोऱ्हाळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण संचालक व क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. माने, प्रा. डॉ. के. एल. गिरमकर यांनी प्रा. कुठे यांचे अभिनंदन केले.