Breaking News

लोकसेवा सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने घरकाम करणा-या महिलांसाठी रोजगार मेळावा


अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई व परिसरातील गरजू महिलांना लोकसेवा सामाजिक संस्था यांच्या वतीने खादी ग्रामोद्योग विभागांतर्गत घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख यांनी केले त्या खादी ग्राम उद्योग विभागाच्या माध्यमातून व लोकसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरकाम करणा-या महिलांसाठी रोजगार मेळाव्यात बोलत होत्या.
अंबाजोगाईत लोकसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने खाली ग्रामोद्योग विभागाच्या मार्फत आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र व गुजरातचे संचालक संजय हेडाऊ,लोकसेवा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख, अहेमद पाशा देशमुख, हाफिस देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.येथील सदर बाजार भागात आयोजित करण्यात आलेल्या खादी ग्रामोद्योग रोजगार मेळाव्यात शहर व परिसरातील अनेक महिलांची उपस्थिती होती. लोकसेवा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख यांनी आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबून तसेच महिलांना घर बसल्या रोजगार उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपसली आहे. त्यांना नुकतेच खादी ग्रामोद्योग अंतर्गत चालविण्यात येणार्या उपक्रमाला परवानगी मिळाली आहे. खादी ग्रामोद्योग महिलांना घर बसल्या उद्योग मिळणार असून अंबाजोगाईतील महिलांना वेगळीच पर्वणी असेल. ज्या महिला धुणीभांडी असेल किंवा इतर कामे करण्यासाठी त्यांना घरापासुन दूर जावे लागत होते. तसेच त्यांना उद्योगा विषयीची आवड होती. अशा महिलांचे संघटन करून या महिलांना उद्योगाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख या करित आहेत. आता खादी ग्रामोद्योग विभागर्तंगत विविध उद्योगासाठी 35 टक्के सबसीडीने जवळ-जवळ पंचवीस लाख पर्यंत कर्ज पुरवठा केला जातो असे यावेळी बोलताना महाराष्ट्र व गुजरातचे संचालक संजय हेडाऊ यांनी सांगितले. ते खादी ग्राम उद्योग विभागाकडून उपस्थित राहिले होते. महाराष्ट्र व गुजरातचे संचालक संजय हेडाऊ यांनी या मेळाव्यातून महिलांना मौलीक मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी व्यासपीठावर संजय हेडाऊ,संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख,सहाय्यक प्रतिनिधी अहमद, शेखर,मनोज,अब्दुल हाफिज देशमुख सह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून अहमद पाशा देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लोकसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.