Breaking News

अमित पांडे यांना केलेल्या मारहाणीप्रकरणाचा आम आदमी पक्षाकडून निषेध

लातूर,  - लोकशाही असणार्‍या या देशात शांतीपूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असताना देखील असा प्रकार घडणे निषेधार्ह आहे. या प्रकरणात दोषी असणार्‍या पोलीस कर्मचारी फर्मान सलेमिया बार्बा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते अमित पांडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहोत, असेही सांगण्यात आले आहे.


लातूर येथील गांधी चौक येथे आपने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते अमित पांडे यांना लातूर पोलिसांनी अमानुष मारहाण केली. दिल्ली पोलिसांनी येथील सिलिंग विरोधात आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांना केलेल्या लाठीचार्जच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी लातूर येथील आप कार्यकर्ते गांधी चौक येथे जमले असता लातूर पोलीस कॉन्स्टेबल फर्मान सलेमिया बार्बा यांनी कार्यकर्ते अमित पांडे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे नेले व त्यांना जबर मारहाण केली गेली. या आंदोलनाची रितसर परवानगी पो.ठाणे यांच्याकडून घेतली गेली असताना देखील असा प्रकार घडला, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.