Breaking News

औरंगाबादमधील कापड शिलाईच्या कारखान्याला आग


औरंगाबाद,  - येथील सिटीचौक भागातील कापड शिलाईच्या कारखान्याला आज सकाळी आग लागली. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आहे. मात्र या आगीत दुकान मालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या आगीत कारखान्यातील शिलाई यंत्रे आणि कापडाचा माल पूर्ण जळून खाक झाले.