उजनीच्या कालव्यात सापडले तरुणाचे मुंडके
सोलापूर, दि. 04, फेब्रुवारी - माढा तालुक्यातील वडोली गावाच्या हद्दीत उजनी धरणाच्या कालव्यात एका अज्ञात तरुणाचे मुंडके सडलेल्या अवस्थेत आढळून आले . धड गायब असलेल्या तरुणाची ओळख पाठविण्याचे व त्याच्या मारेकर्यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान टेंभुर्णी पोलिसांपुढे आहे.
यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार आज,शनिवारी सकाळी वडोली शिवारातील उजनी धरणाच्या कॅनॉलमध्ये माणसाचे डोके वाहत येऊन ते एका काटेरी झाडात अडकल्याचे काही शेतकर्यांना दिसून आले. वडोली गावचे पोलिस पाटील धनाजी नामदेव काळे यांनी टेंभुर्णी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा क रून मुंडके ताब्यात घेतले.
या घटनेतील मृत इसम 35 ते 40 वर्ष वयोगटातील असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला असून त्याचा चेहरा पूर्णपणे सडलेला असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड बनले आहे. मारेकर्यांनी पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने त्याचे धड कोठेतरी टाकून दिले असावे व फक्त मुंडके कालव्यात फेकून दिले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, या घटनेचा सपोनि राजेंद्र मगदूम हे अधिक तपास करीत आहेत.