Breaking News

घणसोलीत अमृत अभियान योजनेच्या कामात भ्रष्टाचार


नवी मुंबई, दि. 04, फेब्रुवारी - घणसोली मधील अमृत अभियान योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरु असल्याचा मनसेने आरोप केला आहे. या संपूर्ण कामाची निःपक्षपातीपणे चौकशी करावी व दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची पालिका आयुक्तकडे मागणी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घणसोली सेक्टर-9, प्रभाग क्र. 35 मध्ये नाल्याशेजारील जागेमध्ये केंद्र सरकारच्या अमृत अभियान योजने अंतर्गत काम सुरु आहे. सदरचे काम मेसर्स ए.पी.कंस्ट्रक्शन या कंत्राटदाराने दीड कोटी रुपयांना महापालिकेची निविदा भरून घेतलेले आहे. परंतु या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी केला आहे.