Breaking News

गिरणा नदीवरील पूलासाठी 6 कोटी रूपये मंजूर

जळगाव, दि. 04, फेब्रुवारी - भडगाव येथील गिरणा नदिवर पांढरद ते निंभोरा दरम्यान नाबार्डमधून पूल मंजुर झाला आहे. त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. या पुलामुळे गिरणा नदिच्या दोन्ही भागातील गावांना जाण्या येण्यासाठी 10-15 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. 


गिरणा नदीवर पाढंरद ते निंभोरा येथे पूल व्हावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी शासनाकडे सातत्याने लावून धरली. त्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यामुळे नाबार्डमधून या पुलाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी तब्बल सहा कोटी रूपये मंजूर झाले असल्याचेही आ.पाटील यांनी सांगितले. पाढंरद, वडजी, पिचर्डे, खेडगाव, नालबंदी, पळासखेडे, महिदंळे, वाक या गावाना कजगाव, चाळीसगाव, नगरदेवळा जाण्यासाठी तब्बल 15 किलोमीटरचा फेरा वाचणार आहे. तर निंभोरा, बोदर्डे, कजगाव, कोठली, क नाशी, लोणपिराचे आदी गावांनाही पांढरद भागात येण्यासाठी हा पूल सोयीचा ठरणार आहे.