Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद


नवी दिल्ली : एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व प्रजाहितदक्ष राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने राजधानीत 19 व 20 फेब्रुवारी2018 दरम्यान वैविध्यपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनांसह शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत,नौदल प्रमुख ॲडमीरल सुनील लांबा, श्री शाहू छत्रपती महाराज आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.