Breaking News

आयओटी आणि स्मार्ट सिटी परिसंवाद : देशाची स्मार्ट सिटी निर्मितीकडे वाटचाल

विज्ञान-तंत्रज्ञान आणि नागरी प्रशासन यांची सुयोग्य सांगड घालून नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्याच्या उद्दिष्टाने केंद्र शासनाने देशातील 100 शहरांना स्मार्ट शहरे बनविण्यासाठीची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली असून देशाची स्मार्ट सिटी निर्मितीकडे वाटचाल सुरु झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

येथील बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील मैदानावर आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स-2018’ मध्ये ‘आयओटी आणि स्मार्ट सिटी’ या विषयावरील परिसंवादात सुरेश सुबुध्दी, दिना तमामी, अभिषेक लोढा, जॉय राजन, श्रीवत्स कुम्मीशेट्टी आणि ब्रिजेश सिंह यांनी विचार मांडले.

सुरेश सुबुध्दी म्हणाले सन 1991 मध्ये स्वतंत्र झालेल्या युरोपमधील एस्टोनिया हा छोटा देश स्मार्ट झाला आहे. या देशात सुमोर 99 टक्के सेवा या डिजिटल स्वरुपात नागरिकांना पुरविल्या जातात. या देशातील नागरिकांच्या सहभागाने या देशाने एवढ्या कमी कालावधीत आपल्या देशाला स्मार्ट बनविले आहे. एस्टोनियासारखा छोटा देश जर स्मार्ट होऊन शकतो तर महाराष्ट्रातील शहरे देखील स्मार्ट होऊ शकतात. स्मार्ट सिटी संकल्पना यशस्वीरित्या राबविण्याकरिता दोन्ही बाजूंनी संवाद आणि प्रयत्न आवश्यक आहे.