Breaking News

ट्रिलियन डॅालर इकॉनॉमीमध्ये स्टार्टअप युवा उद्यमींचे स्थान महत्त्वपूर्ण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ट्रिलियन डॅालर इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्रातील स्टार्टअप युवा उद्यमींचे स्थान निश्चितच महत्त्वपूर्ण राहील, असा विश्र्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र- कॅान्व्हर्जन्स-२०१८ जागतिक गुंतवणूक परिषदेच्या निमित्ताने आयोजित दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात इनोव्हेटर्स ऑफ महाराष्ट्रा - स्टार्टअप सेशन ॲण्ड ॲवार्ड या सोहळ्यात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. स्टार्टअप उद्योगाशी निगडीत या स्पर्धेत मेडप्राईम टेक्नॅालॅाजीने प्रथम क्रमांक पटकाविला. केअरएनएक्स प्रा. लिने दुसरा तर ब्लिटेक प्रा.लि.ने तिसरा क्रमांक पटकाविला.विजेत्यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे पन्नास लाख, तीस लाख आणि वीस लाख रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.