Breaking News

कंत्राटी कामगारांना कायम स्वरुपी करण्यासाठी संघटना प्रयत्नशील -सोमनाथआप्पा शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील एक्साईड इंडस्ट्रीज कंपनी समोर राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या फलकाचे अनावरण कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथआप्पा शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हाध्यक्ष जयदिप बडदे, दत्ता हारगुडे, बाबा घोलप, बिपीन खंडागळे आदि उपस्थित होते.

या फलकाच्या अनावरणा नंतर कंपनीच्या प्रवेशद्वारात सभा घेण्यात आली. या सभेत कामगार युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन काळे तर जिल्हा सरचिटणीसपदी रविंद्र वाकळे यांची निवड करण्यात आली. यावेळी किरण शिंदे, किरण वाकळे, सुरज विधाते, राहुल भाले, अमित बारस्कर, शाहू वडागळे, किरण चेमटे, बाळासाहेब बारस्कर आदिंसह युनियनचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोमनाथआप्पा शिंदे म्हणाले की, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देत, कंत्राटी कामगारांना कायम स्वरुपी करण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे. एक्साईड इंडस्ट्रीज कंपनीतील 264 कामगारांपैकी 200 कामगार राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे सभासद असून, अनेक अडथळे बाजूला सारत कामगारांच्या एकजुटीने या फलकाचे अनावरण झाले आहे. कामगारांचे प्रश्‍न सोडवून, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संघटना कामगारांच्या पाठिशी उभी राहणार आहे. काही संघटना दिशाभुल करुन मालकाचे हित जोपासायला निघाल्याचा आरोप त्यांनी केला