Breaking News

अवास्तव खर्चाला पायबंद घालण्यासाठी बँकेचे वाहन, मानधन घेणार नाही - केदा आहेर

नाशिक ;- अवास्तव खर्चाला पायंबद घालण्याबरोबरच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाहन व मानधन न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय अध्यक्ष केदा आहेर यांनी स्वतः पासून घेतला आहे. बँकेच्या वसुलीबाबत कडक धोरण राबवून शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहचण्यासाठी तालुकानिहाय मेळावा घेतले जाणार असल्याचे अध्यक्ष आहेर यांनी सांगितले. 


आरबीआयच्या संचालक मंडळ बरखास्ती कारवाईनंतर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची पहिलीच बैठक अध्यक्ष केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनतर ते बोलत होते. बैठकीत बँकेच्या वसुली व कर्जवाटपाबाबत आढाव घेऊन सद्यस्थितीची माहिती संचालकांनी घेतली. बॅकेच्या महत्वाच्या असलेल्या कमिटया स्थापन करून त्यांच्यावरील संचालक नेमणूक करण्याबाबतचे सर्वाधिकार अध्यक्ष आहेर यांना देण्याचा ठराव झाला. वसुलीला प्राधान्य देण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी कोणाचीही गत करायची नाही वा पाठीशी घालयाचे नाही, असेही बैठकीत ठरले.
बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी काय करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाली. याकरिता बँकेतील अनावश्यक खर्चाला पायबंद करण्याबाबत निर्णय झाले. यात बँक अध्यक्षांना असलेले वाहन न वापरण्याचा तसेच बँकेच्या बैठकींना मिळणारे कोणतेही मानधन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे अध्यक्ष आहेर यांनी सांगितले.