Breaking News

काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सागता

श्री संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कर्जत येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला होता, सुरू असलेल्या या हरिणाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. 
आज माघ वैद्य चतुर्थी याच दिवशी श्री संत सद्गुरू गोदड महाराजांनी श्री क्षेत्र कर्जत येथे संजीवन समाधी घेतली, त्यानिमित्त कर्जत येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत केला गेला. या सप्ताहाची डोंगरगण (सीताचे) येथील पुंडलिक महाराज जंगलेशास्त्री यांचे काल्याचे कीर्तनाणे सांगता झाली. यावेळी जलसंधारणमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील स्त्री पुरुष भाविक उपस्थित होते. श्री संत सद्गुरू गोदड महाराज मंदिरात दुपारी 12 वाजता संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला. दुपारी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे सह सचिन कुलथे, सुशील कुलथे यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आज सायंकाळी 7 वाजता महाराजांच्या समाधी मंदिरातून पालखी निघून पूर्ण कर्जत शहरातून ही पालखी नगर प्रदक्षिणेसाठी फिरवली जाते. रात्रभर शहरातील लोक आपापल्या दारी दर्शन घेवून सकाळी 5 वा. पालखी पुन्हा मंदिरात येते. पूर्ण रात्र ही पालखीसह भजनी मंडळ दिंडी गावातील सर्व भक्तगण सहभागी होतात.