7 हजार कोटयाधीशांनी सोडले देशाचे नागरिकत्व ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून धक्कादायक माहिती
नवी दिल्ली : 2017 या वर्षात तब्बल सात हजार कोटयाधीश नागरिकांनी भारत देशाचे नागरिकत्वाचा त्याग करत परदेशात स्थायिक होण्याचा मार्ग पत्करला आहे. न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कोट्यधीशांनी देश सोडणार्यांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक आहे.
‘न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या रिपोर्टनुसार, 2016 च्या तुलनेत 2017 मध्ये 16 टक्क्यापेक्षा अधिक कोट्यधीशांनी भारताचे नागरिकत्व सोडून दुसर्या देशाचे नागरिकत्व मिळवले. 2016 मध्ये हा आकडा सहा हजार होता. त्यापूर्वी 2015 मध्ये चार हजार भारतीय कोट्यधीशांनी आपले नागरिकत्व सोडून इतर देशात स्थायिक झाले होते. या यादीत चीन पहिल्या क्रमांकावर आहे. 2017 मध्ये चीनमध्ये तब्बल दहा हजार कोट्यधीशांनी आपले नागरिकत्व सोडून दुसर्या देशाचे नागरिकत्व मिळवले. चीन आणि भारतानंतर तुर्कस्थानमध्ये सहा हजार, ब्रिटेन चार हजार, फ्रान्स चार हजार आणि रशियामधील तीन हजार कोट्यधीशांनी आपापल्या देशाचे नागरिकत्व सोडून, दुसर्या देशाचे नागरिकत्व मिळवले. भारत सोडून इतर देशात स्थलांतरित होणार्यांनी सर्वाधिक पसंती अमेरिकेला दिल्याचेही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. त्यापाठोपाठ, इंग्लंड, कॅनेडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशातही अनेक कोट्यधीश स्थायिक झाले आहेत. तर चीनचे नागरिकत्व सोडलेल्या कोट्यधीशांनीही अमेरिकेपाठोपाठ, कॅनेडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांना पहिली पसंती दिली आहे. दरम्यान, ज्या कोट्यधीशांनी आपले भारतातील नागरिकत्व सोडले आहे, त्यामुळे देशाला चिंतेची गरज नसल्याचे रिपोर्टमध्ये नमुद करण्यात आले आहे. कारण, जितक्या क ोट्यधीशांनी भारतातून स्थलांतर केले आहे, त्यापेक्षा जास्त नवे अब्जाधीश भारताशी जोडले जात असल्याचे रिपोर्टमधून सांगण्यात आले आहे.