मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्याची पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काही कट्टरवादी संस्थांनी सोनू निगमची हत्या करण्याचा कट रचला आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या गुप्तचर विभागाने पोलिसांना दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेकडून असं सांगण्यात आलं आहे की, या कट्टरवादी संस्था कोणत्याही पल्बिक प्लेसमध्ये किंवा कार्यक्रमात सोनू निगमवर निशाना साधू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून सोनू निगमच्या सुरक्षेत वाढ क रण्यात आली आहे. बॉलिवूडचा हा प्रसिद्ध गायक मागच्या वर्षापासून सकाळी होणार्या अजानवर आवाज उठवत आहे. सकाळी होणार्या अजानवर त्याने अनेक कार्यक्रमात भाष्य केलं आहे. यामुळे काही मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या.
सोनू निगमच्या जीवाला धोका; पोलीस सुरक्षामध्ये वाढ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:11
Rating: 5