Breaking News

भाजपच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन


नवी दिल्ली : भाजपच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. नवी दिल्लीच्या लुटेन्स भागात पंडित दीनदयाळ उपाध्याय मार्गावर ही नवी इमारत आहे. सत्तेत असणार्‍या पक्षाचे कायमस्वरूपी मुख्यालय असण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची सध्याची मुख्यालये सरकारी इमारतींमध्ये आहेत. या नव्या इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत.