Breaking News

गणित प्रश्‍नमंजूषा आणि प्राविण्य परीक्षेत ‘ध्रुव’चे यश


संगमनेर/प्रतिनिधी :- अहमदनगर जिल्हा अध्यापाक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित प्रश्‍नमंजुषा व गणित प्राविण्य परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव अकॅडेमीने घवघवीत यश मिळविले. तनिष्क विनोद मिलाणी व प्रगती राजेश मालपाणी यांनी उत्कृष्ट गुणांकन प्राप्त करीत गौरवपदके मिळविली. दहा विद्यार्थ्यांनी राज्य तर पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय प्रज्ञा परीक्षेसाठीची दारे उघडली आहेत. जिल्हा अध्यापक मंडळाने घेतलेल्या गणित प्रश्‍नमंजुषा परीक्षेत ‘ध्रुव’च्या इयत्ता सहावीतील तनिष्क विनोद मिलाणी याने (९१) व दहावीतील प्रगती राजेश मालपाणी या विद्यार्थीनीने (८९) गुण मिळवित प्रमाणपत्रासह गौरवपदक मिळविले. इयत्ता सातवीतील हर्ष अभिजीत भावसार व नववीतल्या नील जितेश राजपाल यांनी अनुक्रमे ७८ व ८१ गुण मिळवतांना प्रमाणपत्रे मिळविली. गणित प्रावीण्य परीक्षेत तनया विक्रम गाडे (८८), तन्मय सुरेश घोलप (८७), जिया अमित बाफना (८६), श्रेयन अंकीत कासार (८५), संस्कृती दत्तु शेळके (८४), निषाद संजय विखे (८२) व ओम वेणूनाथ शिंदे (७६) व इयत्ता आठवीतील अक्षद राजेंद्र म्हस्के (९०), समृद्धी दत्तु शेळके (८९), पार्श्‍व अमित बोरा याने ८७ गुण मिळविले. कृष्णा रमेश दिवटे (७१), अद्वय अनिल जोशी (७०), अर्पीत रविंद्र भंडारी (६९), पार्थ संदीप चोथवे व इयत्ता आठवीतल्या सत्यम नितीन लाहोटी याने ७० गुण मिळविले. जिल्हास्तरीय गणित प्रश्‍नमंजुषा व प्रावीण्य परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल ‘ध्रुव’चे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.