Breaking News

देवळाली प्रवरा येथे सर्वपक्षीयांच्या वतीने कडकडीत बंद


महाराष्ट्र राज्य पुरोगामी विचारसरणीचे आहे. एखादा लोकप्रतिनिधी इतका उद्धट आणि असभ्य बोलू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुरोगामी राज्यात छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य उपमहापौर सारख्या व्यक्तीने करावे ही निंदनीय बाब आहे. देवळाली प्रवरा येथे सर्वपक्षीय एकत्र येवून कडकडीत बंद पाळून श्रीपाद छिंदम याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी संतप्त प्रतिक्रिया देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केल्या. देवळाली प्रवरा येथे काल सर्वपक्षीयांच्या वतीने बंद पाळून देवळाली प्रवरा बाजारतळावर जाहीर निषेध सभा घेवून श्रीपाद छिंदम याच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बोलताना सांगितले की, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षांची वाटचाल असून महाराष्ट्राचे दैवत म्हणून छत्रपतींना गणले जाते. नागरिक व कार्यकर्त्यांनी बंद पाळतांना शांततेत बंद पाळावा असे आवाहन नगराध्यक्ष कदम यांनी केले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सतीश वाळूंज, शैलेंद्र कदम, डॉ. संदीप मुसमाडे, रफिक शेख, सुनील कराळे आदींनी निषेध सभेत छिंदम याचा निषेध करून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी शहरातील नागरिक व व्यापारी वर्ग यांच्याबरोबरच मच्छिंद्र कराळे, रावसाहेब कदम, अनंत कदम, सावळेराम कदम, रमेश टीक्कल, नानासाहेब पठारे, बाबासाहेब देशमुख, भगीरथ कदम, संतोष चोळके, बाळासाहेब गाढे, भगवान गडाख, डॉ. नामदेव कडू, अर्जुन मुसमाडे, अमोल कदम, प्रसन्न पंडित, सचिन ढूस, शरद वाळके, अनिल सबरवाल, बाबासाहेब कारळे, संजय सिनारे आदी उपस्थित होते.