Breaking News

निषेधार्थ शहरटाकळी बंदला प्रतिसाद


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणार्‍या उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांकडून छिंदमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महापुरुषांची बदनामी करण्याचे घाणेरडे षड.यंत्र काही लोकांकडून रचले जात असुन बहुजन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. अशा देशद्रोही व्यक्तिस कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत यावेळी झालेल्या निषेध सभेस शहरटाकळी सेवा सोसायटी अध्यक्ष अ‍ॅड. अनिल मडके, युवा नेते संभाजी गवळी, भाजपा सरचिटणीस वाय डी कोल्हे आदींनी बोलताना व्यक्त केले. यावेळी प्रदीप गवळी, आत्माराम कुंडकर, राजेंद्र खंडागळे, संदीप राऊत, गणेश इथापे, संतोष गादे, मोहन खंडागळे, देविदास चव्हाण, संतोष शेटे, समिर कोल्हे, देविदास दगडे, विलास काकडे, प्रशांत वेलदे, संतोष आडकित्ते, कैलास लद्दे, राम चव्हाण, पंढरीनाथ कोल्हे सह नागरीक उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून घटनेचा निषेध व्यक्त केला.