Breaking News

कुळधरण, भांबोर्‍यात छिंदमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ कुळधरणसह भांबोरा येथे छिंदमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. कुळधरण तसेच धालवडी येथील ग्रामस्थांनी कुळधरणच्या छत्रपती शिवाजी चौकात शनिवारी सायंकाळी 7 वाजता छिंदमच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन पुतळ्याचे दहन केले.
यावेळी शेषेराव सुपेकर, सुधीर जगताप, सतीश कळसकर, बंडू सुपेकर, अरुण तांबे, सुनील पाटील, शामराव गजरमल, बाळासाहेब सुपेकर, हनुमंत सुपेकर, सुहास सुपेकर, प्रताप सुपेकर आदींनी निषेध केला. भांबोरा येथेही छिंदमच्या पुतळ्याचे शिवप्रेमींकडून दहन करण्यात आले. त्याचबरोबर बेर्डी, सिद्धटेक, जलालपूर, दुधोडी, बारडगाव, अंबिकानगर भागातील नागरिकांनीही आपला संताप व्यक्त केला.शिवजयंती उत्सवास कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेवून तालुक्यात शांततापूर्ण मार्गाने ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला.