Breaking News

उसाचा ट्रक इनोव्हा गाडीवर कोसळला


नेवासा/तालुका प्रतिनिधी/- नगर-औरंगाबाद महामार्गावर वडाळा बहीरोबा येथील हाॅटेल समाधान समोर उसाने भरलेला ट्रक कोसळल्याने इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र यात कुठलीही जिवितहानी झाली नाही.
याबाबतची मिळालेली माहिती अशी की नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटाकडून मुळा कारखान्याकडे उस वाहतुक करणारा ट्रक ( एम.एच.16-बी.1794) जात असताना पाठीमागून येना-या गाडीने कट मारल्याने ट्रक चालकाने ट्रक डिव्हायडरवर चढवला. त्यामुळे उसाने भरलेला ट्रक मागून येणा-या इनोव्हा (एम.एच.21,व्ही.7511 ) गाडीवर कोसळला. या अपघातात दोन्हीही चालक सुखरूप वाचविले आहे.