सिजेंटा कंपनीचा शेतकर्या हाती धतुरा मक्याला नाही लागला तुरा बोगस बियाण्यांचा मारा,पेस्टीसाइडचाही भपारा
नाशिक/ प्रतिनिधी :- एका बाजुला जिल्हा कृषी खाते शेती आणि शेतकर्यांसाठीच्या योजनांमध्ये होणार्या अपहारावर नियंञण ठेवण्यास सपशेल कुचकामी ठरत असताना शेतीसाठी लागणारे बियाणे,किटक नाशक तयार करणार्या कंपन्यांकडून राजरोस होणारी फसवणूक थांबविण्यात अपयशी ठरल्याने बळीराजांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे.सिन्नर आणि दिंडोरी तालुक्यातील शेतकर्यांना कृषी उत्पादन कंपनींच्या नफेखोर प्रवृत्तीमुळे हातच्या पिकावर नांगर फिरवावा लागल्याने आत्महत्येची वेळ आली तरीही कृषी अधिकारी आकड्यांचा खेळ खेळण्यात व्यस्त आहेत.
सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील शेतकरी सुखदेव बोडके यांच्या शेतातील 2 एकर शेतातील सिजेंटा कंपनीचे मका शुगर या जातीचे मका बियाणे पीक पूर्णपणे खराब निघाले असून मक्याची कणसे पूर्ण वाकडी होऊन गेली आहेत तर कुठे कुठे तुराही निघाला नाही,या पिकावर गुजराण असलेल्या बोडके परिवाराने मका पिकावर 4 महिने अतोनात कष्ट केले होते,मक्याची शेती बोगस बियानेमुळं उध्वस्त झाल्याने कृषिविभाग कळवूनही पंचनामा करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे कळताच शेतकरी वाचवा अभियान तथा जनस्वराज्य संघटनेचे नाना बच्छाव,प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश चव्हाण यांनी मका शेताला भेट देऊन कृषिविभागाने सिंजेटा या बोगस बियाणे कंपनीवर कारवाई करावी व शेतकरी बोडके यांना पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे,
अशीच एक दुसरी घटना वणी बुद्रुक (ता दिंडीरी)येथील सुदाम ढगे यांच्या द्राक्षावर फवारणी केलेल्या औषधाने द्राक्ष घड अक्षरशा डागाळलेले आहेत,तडे गेले आहेत द्राक्ष शेतकरी सुदाम ढगे यांच्या ही द्राक्ष शेतीला बोगस पेस्टीसाईड औषधाने नुकसान झाले आहे
काल आमच्या एका शेतकरी बांधवाचा फोनआला आणि त्यांनी मला सर्व हकीकत कथन केली व आम्ही सिन्नर तालुक्यात सकाळी सोनगिरी या नायगाव जवळ असलेल्या शेतकरी बांधवाच्या शेतावर पोहचलो तर तिथ पाहिल्यावर अस लक्षात आल की संपूर्ण 4 महिने 2 एकर क्षेत्रात केलेली मका पिकावर केलेली मेहनत ,बियाणे ,खत,औषध,आणि महत्त्वाचे म्हणजे आज हातातोंडाशी आलेला घास वायाला गेल्याच दुःख हिरामण सुखदेव बोडके या तरुण शेतकर्याने शेतकरी बचाव आंदोलन कार्यकर्त्यांकडे बोलून दाखवले.हिरामणचे वडील सुखदेव बोडके यांनी 4दिवसापासुन जेवण सोडल्याचे कळल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नैराश्यातून आत्महत्येचा विचार बोलून दाखवला.
खा.राजु शेट्टी,आ.बच्चु कडु यांच्यापर्यंत हा विषय तडीस नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेतकर्यांच्या रोज आत्महत्या होत असताना शासकीय यंञणा एकदम सुस्त काम करतात असा आरोप कार्यकर्त्यांनी केला असून घटनास्थळी कार्यकर्ते पोहचल्यावर उपविभागीय अधिकारी कानवडे कृषी विद्यापिठाचे शास्ञज्ञ डाँ.बी.एस.रासकर.तालुका कृषी अधिकारी श्री.भदाने कृषीसहायक सौ.कळसकर उपस्थित झाले.त्या सर्वाशी सविस्तर चर्चा करुन पंचनामा करुन संबंधित शेतकर्यांचे जे नुकसान झाले आहे त्यांना संपूर्ण भरपाई करुन देण्यात यावी अशी मागणी केली आणि संबंधित सिजेंटा कंपनीवर कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी केली. पिडित शेतकरी .बोडके या कुटूंबाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर संबंधित कंपनीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. याप्रंसगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चव्हाण तसेच महाराष्ट्र जनस्वराज्य संघटनेचे नाना बच्छाव उपस्थित होते.