आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत मुंबईच्या अभिषेकची बाजी
मुंबई, दि. 10, नोव्हेबर - वन्यजीव विषयक सेंच्युरी एशिया या मासिकातर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्र स्पर्धेत मुंबईतील अभिषेक साटम या तरुणाच्या छायाचित्राला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी आशिया खंडातील जवळपास 5 हजाराहून अधिक छायाचित्रकारांनी छायाचित्रे पाठविले होते.
स्पर्धेच्या आर्ट इन नेचर या विभागात अभिषेकच्या छायाचित्राला पुरस्कार देण्यात आला आहे. आर्ट इन नेचरमध्ये केवळ एकाच विजेत्याची घोषणा करण्यात येते. मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला असून अभिनेत्री वहिदा रेहमान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.