इंटरनेट नवलेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ : डॉ. चवरे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि कोल्हार येथील प्रवरा ग्रामीण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विषयाच्या ‘आंतरजालीय हिंदी साहित्य : स्वरूप व संभावनाएँ’ तर रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने ‘फिजीको केमिकल एप्लिकेशन ऑफ ज्ञानोटेक्नोलॉजी’ या विषयावरील राज्यस्तरीय चर्चासत्राच्या समारोप समारंभात बोलत होते. ते म्हणाले, आज लेखक साहित्यातील पारंपरिक बंधन तोडून लिहित आहेत. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. आज कोणतीही भाषा कुठल्याही विशिष्ट वर्गाच्या वाचकवर्गासाठी मर्यादित राहिलेली नाही. खऱ्या अर्थाने आतापर्यंत दबलेल्या आवाजाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य इंटरनेटमुळे मिळाले आहे.
