Breaking News

पारितोषिकाची रक्कम सर्वांना समान हवी : राहुल द्रविड


मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप पटकावणारा भारतीय संघ, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफवर बीसीसीआयने बक्षिस जाहीर केल्यानंतर राहुल द्रविड यांनी बीसीसीआयवर नाराची व्यक्त केली आहे. स्वतःला फक्त 20 लाख रूपये दिल्याने द्रविड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल द्रविडने बीसीसीआयला विचारणा केली आहे की, ’वर्ल्डकप जिंकल्यानंतर देण्यात आलेल्या बक्षिसाच्या रकमेत इतके अंतर कशासाठी ?’. मला, माझ्या संघाला आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आलेल्या रोख बक्षिसात इतकं अंतर कशासाठी ठेवण्यात आलं आहे ? तसेच इतर कोचिंग स्टाफच्या तुलनेत मोठी रक्कम देण्यावर राहुल द्रविडने आक्षेप नोंदवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल द्रविडने संपुर्ण कोचिंग स्टाफला एकसमान रक्कम दिली गेली पाहिजे असे आवाहन बीसीसीआयला केले आहे.